पोस्ट ऑफिस बचत खात्यातील नियमात झाला बदल; आता खात्यातच सबसिडी होणार ट्रान्सफर

सुस्मिता वडतिले 
Sunday, 13 September 2020

आपले आधार कार्ड पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी लिंक करावे लागणार आहे. यानंतरच सरकारी सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होणार आहे. 

पुणे : सरकारच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला बँकेचे खाते उघडण्याची गरज पडणार नाही. कारण जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडले असेल तर सरकारी सबसिडी डायरेक्ट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमचे स्वतःचे आधार कार्ड पोस्ट बचत खात्याशी लिंक करावे लागणार आहे. त्यानंतरच सरकारी सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होणार आहे.  पोस्ट ऑफिस विभागातून अशी माहिती दिलेली आहे की, हे करण्यासाठी सुरवातीला ग्राहकांना अर्ज भरावा लागेल आणि खाते आधार कार्डाशी लिंक करावे लागणार आहे.

सरकारने नुकतेच एप्रिल महिन्यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट तसेच दुसऱ्या छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक करण्यासाठी एक कॉमन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म जारी केला होता. त्यातच सरकारने आता ज्यांचे पोस्टात सुरवातीपासूनच खाते आहे, त्यांच्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म जारी केलेला आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन फॉर लिंकिंग/सीडिंग अँड रिसीव्हिंग डीबीटी बेनिफिट्स इन टू पीओएसबी अकाऊंट (Application for Linking/Seeding and Receiving DBT Benefits into POSB Account) या नावाने केलेला आहे. याच पद्धतीने खातेधारक त्यांचे आधार बचत खात्याशी जोडू शकेल. तसेच जात तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने लिंक करायची असेल तर आधार डिटेल्स संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत द्यावे लागणार आहे. 

खात्याची माहिती सरकारी अथॉरिटीसाठी देणे गरजेचे... 

पोस्ट ऑफिस हे बचत खाते धारकांना सबसिडीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या खात्याची माहिती सरकारी अथॉरिटीसाठी देणे गरजेचे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खातेधारकांना खाते क्रमांक हे त्यांच्या आधार क्रमांकासोबत लिंक करणे गरजेचे नाही. परंतु पेंशन आणि एलपीजी-सबसिडी अशा  सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी खाते क्रमांक आणि आधार लिंक असणे महत्वाचेआहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यात आलेल्या बचत खात्यांशी देखील आधार लिंक असणे गरजेचे आहे.

खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम आवश्यकच... 

पोस्ट ऑफिसने बचत खात्यातील काही नियमामध्ये बदल केलेले आहेत. जर का ग्राहकांनी या बदल केलेल्या  नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या खात्यातून पैसे कापले जाऊ शकणार आहे. पोस्टाने बचत खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवण्याची मर्यादा 50 रुपयांवरून 500 रुपये केलेली आहे. जर तुमच्या खात्यामध्ये 500 पेक्षा कमी रक्कम असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पोस्ट ऑफिसकडून 100 रुपये वसूल केले जाणार आहेत. हे नियम फॉलो केले नाहीत तर असे दरवर्षी करण्यात येईल. तसेच तुमच्या खात्यामध्ये झिरो (शून्य) बॅलन्स असेल तर तुमचे खाते बंद करण्यात येईल.  सध्या पोस्टामध्ये व्यक्तिगत किंवा संयुक्त खात्यांवर (On individual or joint accounts) दरवर्षी चार टक्के व्याज दिले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government subsidy direct from post office savings account will now be transferred to your account