...तर राज्यात कोरोनावर नियंत्रण आणता आले असते; पण आता सरकारचा मोठा निर्णय

The government will document the measures taken against Covid 19 disease
The government will document the measures taken against Covid 19 disease

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता काही प्रमाणात त्यात शिथीलता आणून उद्योगधंदे व इतर घटक सुरु केले आहेत. याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. भविष्यात असा साथीचा रोग आला तरी त्याच्याविरुद्ध प्रभावी उपाय योजना करुन लढा देता यावा म्हणून कोरोना व्हायरस (कोविड १९) या साथ रोगाचे डॉक्यूमेंटेशन केले जाणार आहे.
कोरोना व्हायरस हा इतर साथींच्या रोगापेक्षा खूप वेगळा आहे. अशा प्रकारच्या साथीच्या रोगाशी लढा देताना तो राज्यातील यंत्रणांना इतर देशांच्या अनुभवावरुन निर्णय घ्यावे लागले आहेत. यापूर्वी होऊन गेलेल्या साथीच्या रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण आणले याची माहिती उपलब्ध असती तर आणखीन चांगल्याप्रकारे लढा देता आला असता. परंतु असे डॉक्यूमेंटेशन राज्याकडे नाही. त्यामुळे आता कोविड १९ या साथ रोगावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या सर्व उपाययोजनेचे डॉक्यूमेंटेशन केले जाणार आहे. याची जबाबदारी व्यवस्थापीयक संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक गट केला जाणार आहे. या गटाने कोरोना नियंत्रण कक्ष व इतर वेळोवेळी स्वतंत्र आदेशान्वे नियुक्त केलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून केल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांबाबतच्या माहितेचे संकलन केले जाणार आहे. याबरोबर कोरोनामुळे प्रभावित झालेल्या आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारने गाठीत केलेल्या मंत्रीगट व तज्ज्ञ समितीने केलेल्या प्रयत्नांची माहितीही संकलीत केली जाणार आहे. या गटाने संबंधित कार्यालयात जाऊन माहिती उपलब्ध करुन घेऊन व्यवस्थित मांडणी करावी, असे आवाहनही केले आहे. याबाबतचा आदेश महसूल व वन विमागाचे राज्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे. 
महाराष्ट्रात मार्चमध्ये पुण्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर त्याने राज्यभर हातपाय पसरले. त्याला रोखण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. मात्र, अद्याप रोखण्यात यश आलेले नाही. दिवसांदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. टप्प्याटप्याने त्यात वाढ करण्यात आली. ३१ जूनयर्पंत लॉकडाऊन असला तरी आता त्यात शिथीलता आणली आहे. परंतु या लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प झाले. याचा सर्व घटकांवर परिणाम झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले. कामगार अडकून पडले होते. आता शिथीलता आणली असली तरी अद्याप सर्व सुरळीत झालेले नाही. शिक्षण विभागावरही याचा परिणाम झाला. यापूर्वी असे अनेक साथीचे रोग आले. मात्र त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले. भविष्यात असा साथीचा आजार आला तर काय करावे यासाठी सरकारने आता डॉक्यूमेंटेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com