खातेवाटपाला अखेर राज्यपालांची मंजुरी; शिवसेना म्हणते, विश्रांतीयोगामुळे उशीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 January 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती.

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाला आज (रविवार) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे कधीही खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेने राज्यपालांच्या विश्रांतीयोगामुळे उशीर झाल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते आज सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. अखेर आज सकाळी त्यांनी खातेवाटपावर स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार?

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर मंत्र्यांना बंगला आणि दालनाचे वाटपही झाले. मात्र खातेवाटप अंतिम होत नव्हते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकाही झाल्या. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर खातेवाटप पूर्ण केले आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. राज्यपालांच्या मंजुरीनंतर खातेवाटपाची अधिकृत घोषणा होईल. खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर आज रात्री सही केली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. 

संभाव्य खातेवाटप : 
एकनाथ शिंदे : नगरविकास
सुभाष देसाई : उद्योग
आदित्य ठाकरे : पर्यावरण, पर्यटन
अनिल परब : परिवहन
संजय राठोड : वन
उदय सामंत : उच्च व तंत्रशिक्षण
दादा भुसे : कृषी
संदीपान भुमरे : रोजगार हमी
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
शंकरराव गडाख : जलसंधारण
अजित पवार : अर्थ
अनिल देशमुख : गृह
जयंत पाटील : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरीपुरवठा
नवाब मलिक : अल्पसंख्याक
बाळासाहेब थोरात ; महसूल
अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम
वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari has approved the allocation of portfolios