esakal | साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसीय अधिवेशन बोलवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

koshyari

साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार (sakinaka rape case) झाला होता. यामध्ये त्या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याप्रकरणात उडी घेतली असून दोन दिवसीय अधिवेशन बोलाविण्याची (governor koshyari letter to CM) मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार : आरोपीचे वडील म्हणाले, मुलाला मारुन...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि दिशा कायद्याबाबत विषयांवर चर्चा करण्यात यावी, असे सांगितले आहे. तसेच याच विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे एक अधिवेशन बोलवावे, असेही या पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यपालांना अधिवेशन बोलाविण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकी काय आहे घटना?

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन देणारी भीषण घटना मुंबईत साकीनाका येथे घडली होती. साकीनाका भागात टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. प्राथमिक तपासानुसार पीडितेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पोमध्ये ही घटना घडली. टेम्पोच्या आत रक्ताचे डागही आढळले होते. उपचारादरम्यान त्याचा महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

loading image
go to top