राज्यपालांची बंडात एन्ट्री? सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyaris

राज्यपालांची बंडात एन्ट्री? सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता

सोलापूर - शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदेंनी सोबत ४० पेक्षा आमदार नेल्याचा दावा केला असून त्यात राज्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्री आहेत. राज्यातील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आले आहे. मात्र, हे सर्व विधानसभेत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होऊन राजभवनात दाखल झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात, असा सूर कायदेतज्ज्ञांमधून उमटत आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे ५५, काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर पाठिंबा दिला होता. त्यापैकी आता किती त्यांच्यासोबत राहतात, हे विधानसभेत बहुमत चाचणीच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, भाजपकडे १०६ आमदार असून काही अपक्षांचा त्यांनाही पाठिंबा आहे. महाविकास आघाडीकडे सध्या कागदावर तरी बहुमत आहे. आता सरकार अल्पमतात आल्याचे मानून राज्यपाल राज्य सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करायला लावू शकतात, अशीही चर्चा आहे.

राजभवन पुन्हा केंद्रस्थानी

शिवसेनेचे नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरूध्द बंड पुकारून ५५ पैकी ४० हून अधिक आमदार गुवाहाटीला नेले आहेत. त्यात नऊ मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्याचा कारभार सांभाळताना बंडखोरी करून मंत्री कारभार सोडून जाणे हे घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर आहे. त्यावरही राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष आता राजभवनाकडे असणार आहे.

Web Title: Governors Entry Into Rebellion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..