
मुंबई : राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट तत्वत: लागू करण्याची तयारी दाखवली असून ते लागू करण्यासाठीची कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे. त्यासाठी गावपातळीवर समित्यांची स्थापना केली जाणार असून विहित कालमर्यादेत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.याबाबतचा मसुदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे मंगळवारी (ता.३) पाठविण्यात येणार आहे.