Gudi Padwa Shobha Yatra : ठाकरे गटाकडून स्वागत नाही, तरी CM शिंदेंनी केला नमस्कार; पाडव्याच्या शोभायात्रेत काय घडलं?

Eknath Shinde News: कोरोनाच्या संकटानंतर यंदा पहिल्यांदाच राज्यात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
gudi padwa 2023 cm eknath shinde video greeting uddhav thackeray faction workers at dombivali
gudi padwa 2023 cm eknath shinde video greeting uddhav thackeray faction workers at dombivali

Gudi Padwa 2023 Shobha Yatra: कोरोनाच्या संकटानंतर यंदा पहिल्यांदाच राज्यात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाणे तसेच डोंबिवली येथे गुढी पाडव्यानिमीत्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाले. दरम्यान मात्र या शोभायात्रेदरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटातील कडवटपणाचे उदाहरण पाहायला मिळालं. (Marathi Tajya Batmya)

डोंबिवली नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान गुढी पाडव्यानिमीत्तच्या या शोभायात्रेत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वागत करण्यात आलं नाही पण हात जोडून नमस्कार केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.(Latest Marathi News)

gudi padwa 2023 cm eknath shinde video greeting uddhav thackeray faction workers at dombivali
Raj Thackeray Poster : 'भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे'; सभेआधी मनसेची पोस्टरबाजी

नेमकं काय घडलं?

डोंबिवलीच्या गुढी पाडवा यात्रेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील यावेळी मंच उभारण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंचासमोरून जाताना ठाकरे गटाने त्यांचे स्वागत केले नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला.

gudi padwa 2023 cm eknath shinde video greeting uddhav thackeray faction workers at dombivali
Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीचं संकट कायम; IMD चा 'या' जिल्ह्यांना इशारा

यंदा गणेश मंदिर संस्थानचे 100 वे वर्ष तर नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्वागतयात्रेचा उत्साह काही औरच पहायला दिसून आला. या यात्रेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांची देखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com