स्वाइन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मुंबई - राज्यात जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान स्वाइन फ्लूमुळे 268 जणांचा मृत्यू झाला असून, 32 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर प्राधान्याने करावयाच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन आज आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. 

राज्यात नाशिक, पुणे, सातारा यासह अन्य भागांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने आरोग्यमंत्र्यांनी साथरोग नियंत्रण समितीची बैठक बोलविली. या वेळी विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. संजीव कांबळे उपस्थित होते. राज्यात सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेले सुमारे 2300 रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ डेंग्यूची सुमारे 6 हजार 900 रुग्ण आहेत. 

Web Title: The guidelines for swine flu treatment are announced