गुजरातमधील अपघातात महाराष्ट्रातील 11 भाविकांचा मृत्यू

मयुरी चव्हाण-काकडे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

डोंबिवलीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबासह देव दर्शनाला गुजरातला जीपने गेले होते. आज पहाटे भावनगर येथे जीपच्या समोर अचानक ट्रक आल्याने जीप आणि ट्रकची टक्कर झाली. त्यात जीपचा चक्काचूर झाला.

डोंबिवली - गुजरातमधील भावनगर येथे आज (रविवा) पहाटे जीप आणि ट्रक यांच्या झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार झाले असून, मृत सर्वजण महाराष्ट्रातील डोंबिवलीतील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबासह देव दर्शनाला गुजरातला जीपने गेले होते. आज पहाटे भावनगर येथे जीपच्या समोर अचानक ट्रक आल्याने जीप आणि ट्रकची टक्कर झाली. त्यात जीपचा चक्काचूर झाला.

या अपघातात शहा यांच्या कुटुंबातील 11 जण जागीच ठार झाले. मात्र हितेश शहा यांची 80 वर्षाची आई यातून आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश असून सर्वांच्या सर्व डोंबिवलीचे आहेत 

धंधुका-बरवाला रस्त्यावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्वजण भावनगरमधील येथे पलिताना मंदिरात दर्शनासाठी जात होते.

Web Title: Gujarat: 11 killed in collision between jeep, truck