गुजरात आणि कर्नाटकची स्टार्टअपबाबत सर्वोत्तम कामगिरी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ पुरविणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीचा निकाल जाहीर केला.
startup
startupsakal
Updated on
Summary

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ पुरविणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीचा निकाल जाहीर केला.

पुणे - स्टार्टअपला बूस्टर देण्यासाठी विविध राज्य करीत असलेले प्रयत्न आणि स्टार्टअपची कामगिरी यावर आधारित असलेल्या राज्यांच्या क्रमवारीचा तिसऱ्या वर्षीचा निकाल सोमवारी (ता. ४) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला. गुजरात आणि कर्नाटक राज्यांनी स्टार्टअपबाबत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांच्या विभागात मेघालय राज्याने सर्वोत्तम सन्मान पटकाविला आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ पुरविणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीचा निकाल जाहीर केला. पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर गोयल म्हणाले, ‘देशातील स्टार्टअप परिसंस्था जगातील सर्वोत्तम परिसंस्था बनू शकते.’’ केंद्र आणि राज्य सरकारच्या स्टार्ट-अप संबंधित सर्व योजनांच्या मदतीने जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्समध्ये (ओएनडीसी) हजारो स्टार्टअप निर्माण करण्याची ताकद आहे. यूपीआयमुळे देशातील पेमेंट प्रणाली सर्वांपर्यंत पोचली आहे. पुढील पाच वर्षात ओएनडीसी संपूर्ण देशातील ई-कॉमर्समध्ये आपला दबदबा निर्माण करेल. तसेच आपल्याकडे आणखी हजारो स्टार्टअप्स आणि शेकडोंच्या संख्येने युनिकॉर्न असतील.

- पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री

या पाच श्रेणींमध्ये करण्यात आली वर्गवारी :

वर्गवारी - राज्य

- सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये - गुजरात, कर्नाटक

- उत्तम कामगिरी करणारी राज्ये - केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा

- आघाडीवर असणारी राज्ये - आसाम, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश

- आकांक्षित आघाडीची राज्ये - छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान

- उदयोन्मुख स्टार्ट-अप परिसंस्था - आंध्र प्रदेश, बिहार

क्षेत्र आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवणारी राज्ये

१) संस्थात्मक पाठबळ :

  • गुजरात

  • कर्नाटक

  • केरळ

  • महाराष्ट्र

  • ओडिशा

  • तेलंगणा

  • उत्तराखंड

  • तमिळनाडू

  • अंदमान आणि निकोबार बेटे

२) अभिनव संशोधन आणि उद्योजकतेला चालना :

  • कर्नाटक

  • महाराष्ट्र

  • तेलंगणा

  • जम्मू आणि काश्मीर

३) बाजारपेठांची उपलब्धता करून देणे

  • गुजरात

  • कर्नाटक

  • केरळ

  • ओडिशा

  • हिमाचल प्रदेश

  • मेघालय

४) इनक्युबेशनचे समर्थन

  • गुजरात

  • तेलंगणा

  • जम्मू आणि काश्मीर

५) निधी समर्थन :

  • गुजरात

  • कर्नाटक

६) मेंटॉरशिप सपोर्ट

  • आसाम

  • मेघालय

७) सक्षमकर्त्यांची क्षमता वाढवणे

  • गुजरात

  • कर्नाटक

  • केरळ

  • महाराष्ट्र

  • ओडिशा

  • तेलंगणा

  • उत्तराखंड

  • मेघालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com