Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाची स्थिती सांगायची झाली तर यामध्ये भाजप १५८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे.

इतकंच नव्हे तर नवा रेकॉर्डही भाजपनं केला आहे. त्यामुळे भाजपने सत्ता राखली आहे. या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते ते म्हणाले की, गुजरातमध्ये भाजप सरकारच येणार आहे, यात कोणाचं दुमत नाही. कारण देशातील सगळी सत्ता निवडणूकीत वापरली होती, केंद्राने गुजरातच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले.

हेही वाचा- Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये दाखल केले, त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर दिसला", तर पुढे म्हणाले गुजरात निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला म्हणजे देशातील लोकमत एकाच्या बाजूने नाही.

यावर त्यांनी पंजाब आणि दिल्लीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने हे दाखवून दिले, 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपची सत्ता उधळून लावली. त्याच बरोबर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही हेच चित्र आहे. त्यामुळे हळूहळू बदल व्हायला लागला आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केला.