
मुंबई : शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं मान्य केली असून सदावर्तेंना १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं आता सातारा पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. (Gunaratn Sadavarte will now be taken into custody by Satara police Permission granted by court)
गुणरत्न सदावर्ते यांनी साताऱ्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधानं केली होती. त्यामुळं त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळं सातारा पोलीस त्यांचा ताबा घेईल आणि सातारा सत्र कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. त्यानंतर हे कोर्ट ठरवेल की सदावर्तेंना सातारा पोलिसांकडे दिवसांचा ताबा द्यायचा.
आज मुंबईच्या सेशन्स कोर्टात जो युक्तीवाद झाला त्यानुसार, मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळं इतर प्रकरणात मुंबई पोलिसांकडून विविध कलम दाखल करत आहेत. तसेच या प्रकरणाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, याला कोर्टानं अटकाव घातला असून सदावर्तेंना पोलीस कोठडी न देताना न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर सदावर्ते यांना जामीनाचा अधिकार प्राप्त होतो. पण इतर प्रकरणंही त्यांच्यावर दाखल असल्यानं त्यांना १७ दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.