सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस आर्थर रोड कारागृहात पोहचणार

सातार पोलिसांची गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Gunratan Sadavarte News
Gunratan Sadavarte Newsgoogle
Updated on

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य केलं होतं. यासदर्भात एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे ॲड. सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यातही एक गुन्हा दाखल आहे. दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी मिळाला नव्हता. मात्र सातार पोलिसांची गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सकाळी आज सातारा पोलिसांचे (Satara Police) पथक आर्थररोड कारगृहात सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे. (gunratan sadavarte arrested satara police)

Gunratan Sadavarte News
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

दरम्यान, अॅड सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलिसांकडून ७ ते ८ गाड्या या बंदोबस्तासाठी सोबत असणार आहेत. साधारणत: ६० ते ७० पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्तेंना साताऱ्यात आणले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यासोबत मुंबई पोलिसांकडूनही अतिरिक्त पोलिस सातारा पोलिसांच्या मदतीसाठी तैनात केले जाणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे सातारा पोलिस सदावर्तेंना सातारा येथे आणण्यात येणार आहे. सातारा येथे दाखल होताच सदावर्तेंना स्थानिक न्यायालयात हजर करत सदावर्तेची कोठडी वाढवून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते सध्या संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. अकरा तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांना आणखी दोन दिवस दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.

Gunratan Sadavarte News
ST Strike l लवकरच दूध का दूध पानी का पानी होणार ;गुणरत्न सदावर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com