Marathwada : मी दुधखुळा नाही, डॉक्टरेट आहे; स्वतंत्र मराठवाड्याबाबत गुणरत्न सदावर्तेंची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gunratna sadavarte on ambadas danve demand for independent Marathwada conference in osmanabad

Marathwada : मी दुधखुळा नाही, डॉक्टरेट आहे; स्वतंत्र मराठवाड्याबाबत गुणरत्न सदावर्तेंची भूमिका

मागील अनेक दिवसांपासून स्वतंत्र विदर्भाच्या मागणी होत आहे, त्यापाठोपाठ आता मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी देखील पुढे येऊ लागली आहे. याच विषयावर उद्या वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद जिल्ह्यात संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे पोस्टर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

शुक्रवारी 25 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद होणार आहे. मराठवाडा हे स्वतंत्र्य राज्य व्हाव यासाठी याचे आयोजन करण्यात आला आहे.

दरम्यान विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली तशी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी देखील मोठी चळवळ झाली. त्यासाठी बलीदान देण्यात आलं, त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. त्यानंतर आता वेगळं राज्य, प्रांत करणं ही दुटप्पी पणाची वृत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बोलताना महाराष्ट्र हा अखंड असला पाहिजे अशी भूमिका घेतली. विकासाच्या दृष्टीने अन्याय झाला म्हणून वेगळं निघण हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, गुणरत्न सदावर्तेंना पुढे करून याचे आयोजक कोण? याची माहिती घेतली तर यावर बोलण्याची गरज उरत नाही. या परिषदेचे आयोजक कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत हे तपासण्याची गरज आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भूमिका मांडायची हा महाराष्ट्रातील राजकारणाचा दुटप्पीपणा असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: Jitendra Awhad : शरद पवारांनी केलेल्या कौतुकानंतर आव्हाडांचं 'खास' ट्विट; म्हणाले, "साहेब…"

स्वतंत्र्य मराठवाड्याच्या मागणीसाठी होत असलेल्या संवाद परिषदेचे आयोजन हे कोणाच्यातरी पाठिंब्याने होत असल्याच्या आरोपांवर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मी भारताचे संविधान या विषयातील आभ्यासक, विषय तज्ञ आणि डॉक्टरेट आहे, कोणी मला उभं करण्याइतका मी दुधखुळा नाहीये. मला परिपक्वता आहे, असे सदावर्ते म्हणाले आहेत. तसेच विदर्भ आणि मराठवडा हा लोकांच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न बनला आहे, म्हणून स्वतंत्र्य राज्य हवं असेही सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा: NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? माजी खासदाराने तडकाफडकी सोडला पक्ष