'हज'साठी राज्यातून 11 हजार भाविक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे यंदा 11 हजार 527 भाविकांचा हज यात्रेसाठी जाणार आहेत. 29 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान ते मुंबई, नागपूर, औरंगाबाद विमानतळावरून हजला जातील. बंद झालेले अनुदान सबसिडी आणि विमान प्रवासावरील "जीएसटी'मुळे ही यात्रा महागली आहे. शिवाय अगोदर ज्यांनी "उमरा' आणि "हज' केलेला आहे अशा भाविकांना यात्रेला जाण्यासाठी 35 हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत.

हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या खर्चात "अजीजिया' आणि "ग्रीन' असे दोन विभाग असतात. यामध्ये अजीजियासाठी कमी; तर ग्रीनसाठी जास्त खर्च येतो. यंदा हजसाठी राज्यभरातून 43 हजार 804 भाविकांचे अर्ज आले होते. त्यातून 1 हजार 527 भाविकांची निवड झाली. यात्रेसाठी मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जास्त पैसे मोजावे लागतील. देशातून यंदा हज समिती, खासगी पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून एक लाख 75 हजार भाविक हजला जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hajj yatra bhavik