"सीईटी'चे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

राज्य सीईटी सेलमार्फत उच्च तंत्र व उच्च शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवीच्या प्रवेशासाठी यंदा सीईटीसाठी सुमारे साडे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली "एमएचटी-सीईटी' ही परीक्षा 1 ऑक्‍टोबरपासून घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या "पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट सीईटीच्या संकेतस्थळावरून आजपासून डाऊनलोड करता येणार आहे. 

राज्य सीईटी सेलमार्फत उच्च तंत्र व उच्च शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवीच्या प्रवेशासाठी यंदा सीईटीसाठी सुमारे साडे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीईटी सेलने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय असलेल्या "पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यावरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी आवश्‍यक असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपचे हॉलतिकीट अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांची एमएचटी-सीईटी 1 ते 9 ऑक्‍टोबर या कालावधीत होत आहे. प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि पासवर्डच्या साह्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करावयाचे आहे. हॉलतिकीटवर परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षेची वेळ, तारीख, पत्ता आणि विद्यार्थ्यांची वैयक्‍तिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व हॉलतिकीट मिळविण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hall tickets for MHT-CET students are available on the CET website