अजित दादा आणि माझ्यात ‘चांगलं’च साैख्य : हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

प्रामुख्याने अजित पवार यांच्याविषयी बाेलताना त्यांनी आपल्याविषयी अजित दादा यांना फारच साैख्य असल्याची काेपरखळी लगावली.     

मुंबई ः बुधवारी (११ सप्टेंबर) काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांवर जाेरदार प्रहार केला. प्रामुख्याने अजित पवार यांच्याविषयी बाेलताना त्यांनी आपल्याविषयी अजित दादा यांना फारच साैख्य असल्याची काेपरखळी लगावली.     

दरम्यान, भाजपत दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. ‘एका मुलाखतीत त्यांनी आपले विचार मांडले. राज्यातील नेत्यांविषयी बोलताना पाटील यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, अशोक चव्हाण हे बैठ्या राजकारणात तरबेज आहे. पण जनतेच्या राजकारणात कमी पडतात. तर पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय घ्यायला वेळ लावतात.

दरम्यान पाटील पुढे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी मदत केली. त्यांना इंदापुरातून ७१ हजार लीड मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माझ्या घरी येऊन गेले आणि विधानसभेत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस पक्षश्रेठींनाही याची कल्पना होती.

नंतर काय झालं? मी पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना मला माझ्या तिकिटाचा पत्ता नव्हता. त्यामुळे भांबावून जायचो. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेतेही स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधीही लक्ष घालू इतकचं म्हणाल्या”, असं सांगत “सध्या महाराष्ट्रातली काँग्रेस कोण चालवतंय तेच कळत नाही”, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पक्षनिष्ठेबद्दल बोलताना पाटील म्हणाले, पक्षावर निष्ठा असली तरी पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते. कारण शेवटी जनता वाढवते. त्यामुळे खरी जनतेशीच असते. माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापुरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनी मला निर्णय घ्यायला भाग पाडलं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshwardhan patil talk about ajit pawar and his political relation