
Guardian minister : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सरकारने दिलेली होती. ही जबाबदारी मिळताच मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी पालकमंत्री पद सोडल्याचं वृत्त आहे. त्यांच्याजागी दत्तामामा भरणे यांना वाशिमची जबाबदारी मिळू शकते.