मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाकारले आहे. त्या जागेवर आता क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांची वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक, रायगडसोबतच वाशीमचा तिढाही सुटणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज मुश्रीफ यांच्यावर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री म्हणून कोल्हापूर ऐवजी वाशिमची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र ते फक्त २६ जानेवारीच्या कार्यक्रमास वाशीम येथे उपस्थित राहिले. त्यानंतर ते वाशीमला गेलेच नाहीत.
वाशिमचे शिष्टमंडळ आले तर ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच पाठवीत होते, असे सांगितले जात आहे. मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी नाकारताना प्रवासाचे कारण दिले असले तरी, त्यांचा ‘गृह’ जिल्हा कोल्हापूर मिळाला नसल्यानेच नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीत पालकमंत्री पदांच्या निवडीत कोणतेही सूत्र नाही, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीत दबक्या आवाजात बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक मंत्री असताना शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांना पालकमंत्री पद मिळाले.
नाशिकवरुन धुसफूस
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अधिक जागा आहेत. तर भाजपची केवळ एक जागा निवडून आली असतानाही त्यांना पालकमंत्री हवे आहे. त्यामुळेच पालकमंत्री पदावरून महायुती आणि पक्षांतर्गत धुसफूस वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.