esakal | धक्‍कादायक ! दोन चिमुकल्यांचा विचार न करताच चारित्र्याच्या संशयावरुन 'त्याने' केला पत्नीचा खून 
sakal

बोलून बातमी शोधा

murder

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून करुन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस जेलरोड पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच मोठ्या शिताफीने पकडले. हणमंतू गोटे असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी रेणुका (वय 27) यांचा खून केल्याचे उघड असून पोलिस आणखी सखोल चौकशी करीत आहेत. 

धक्‍कादायक ! दोन चिमुकल्यांचा विचार न करताच चारित्र्याच्या संशयावरुन 'त्याने' केला पत्नीचा खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून करुन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस जेलरोड पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच मोठ्या शिताफीने पकडले. हणमंतू गोटे असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी रेणुका (वय 27) यांचा खून केल्याचे उघड असून पोलिस आणखी सखोल चौकशी करीत आहेत. 


अशी आहे थोडक्‍यात हकीकत 
कुचन हायस्कूलजवळ रविवार पेठ परिसरात राहणारा हणमंतू गोटे हा वाहन चालक आहे. मागील काही वर्षांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्याने बुधवारी (ता. 8) पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घरातून पसार झाला. शेजारील व्यक्‍तीच्या माहितीवरुन खून झाल्याचे उघड झाले. बेशुध्द आवस्थेत रेणुका यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. हणमंतु याला दोन लहान मुले असून तो पत्नी व मुलांसोबत रविवार पेठेतील घरी राहत होता. विवाहानंतर काही वर्षांत त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरवात केली. त्यातून त्यांच्यात सतत भांडणे होत होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीस ताब्यात घेतले असून खुनाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती जेलराड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांनी दिली. 

पतीसोबत झालेल्या भांडणाच्या टेन्शनमध्ये दुचाकी धडकून महिला ठार 
सोलापूर : पोलिस आयुक्‍तालयातील महिला सहायता केंद्रात अर्जाची चौकशी करण्यासाठी प्रियंका महेश चादरे (वय 29) बुधवारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा पतीसोबत वाद झाला. त्या टेन्शनमध्ये घरी जाताना दुचाकीवरील तोल सुटला आणि दुचाकी पोलिस आयुक्‍त कार्यालयाच्या तारेच्या कपाउंडला धडकली. त्यामध्ये प्रियंका यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. अपघातानंतर पती महेश चादरे यांनी पत्नी प्रियंका यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

दारुच्या नशेत एकाचा मृत्यू 
सोलापूर : एमआयडीसी रोडवरील विनायक नगरात राहणारे हणमंतू तिपण्णा कोकंती (वय 42) यांचा दारुच्या नशेत मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अमर याने त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात बेशुध्द आवस्थेत दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दारुच्या नशेत बेशुध्द हणमंतु कोकंती यांचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

अज्ञात कारणावरुन महिलेस दोघांकडून मारहाण 
सोलापूर : मोहोळमधील कलावती नगरात राहणाऱ्या अनिता रामचंद्र चौगुले (वय 25) यांना अज्ञात कारणावरुन दोघांनी लोखंडी सळईने मारहाण केली. त्यामध्ये जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबानुसार बाळू सुतार व दिपक सुतार यांनी मारहाण केल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

चक्‍कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू 
सोलापूर : मोहोळमधील चौमुखी मारुती चौक परिसरात राहणारे रावजी मार्तंड देशपांडे (वय 55) हे चक्‍कर येऊन पडले. त्यामध्ये जखम झाल्याने बेशुध्द आवस्थेत त्यांना उपचारासाठी मुलगा योगेश देशपांडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.