मुंबई विमानतळावर आलेल्या ५० हजार प्रवाशांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या सहा देशांमधून गेल्या ३८ दिवसांमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या ५० हजार प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनाबाधित भागातून २९४ प्रवासी राज्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे सोमवारी देण्यात आली.

पुणे - कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या सहा देशांमधून गेल्या ३८ दिवसांमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या ५० हजार प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनाबाधित भागातून २९४ प्रवासी राज्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे सोमवारी देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्याने १८ जानेवारीपासून प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ८५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यापैकी ८४ जणांना या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिला. विलगीकरण कक्षातील ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबईत एक आणि पुण्यात दोन रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात दाखल केलेला ३२ वर्षीय प्रवासी आहे. त्याच्या घशातील द्रवपदार्थ ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health checking of 50000 passengers arriving at Mumbai airport