पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : विद्यार्थ्यांच्या हितासाठीच ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या असतील संभाव्य तारखा

राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे 15, 16 ऑक्टोबर किंवा 22, 23 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा असतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. शाळा सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यांचं नियोजन बघून तारखा ठरवल्या जातील.

न्यासा कंपनीच्या घोळाबाबत म्हणतात...

सामान्य प्रशाशनाअंतर्गत असलेला आयटी डीपार्टमेंटने मागच्या सरकार आणि या सरकारच्या अनुषंगाने कंपन्यांंचं सिलेक्शन केलं. ही कंपनी आरोग्य विभागाने सिलेक्ट केली नाही. आरोग्य विभागाची जबाबदारी एकच होती, ती म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यामुळे ती कंपनी ब्लॅकलिस्ट आहे की नाही, हे पाहणं आयटी डीपार्टमेंटचं असतं. आमच्या विभागाचा बाकी काही संबंध नसतो. तरीसुद्धा आमच्या विभागाने तपसल्यानंतर कंपनीने आम्हाला वेळ पाहिजे असल्याचं कळवलं. म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

जवळपास 95 टक्के काम झालेलंच होतं. मात्र, काही त्रुटी होत्या. म्हणूनच हॉलतिकीट 10 दिवस आधी मुलांच्या हाती मिळतील, याची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. आता कोणतीही ढिलाई दिसणार नाही. चांगल्या स्पिरिटने घ्यावं. 17 हजार जागा भरुन घेणे हाच आमचा हेतू आहे. आरोग्य सेवा सक्षम व्हावी, हा हेतू. आता न्याय देऊन सगळ्या जागा भरुन घेतल्या जातील.

loading image
go to top