esakal | मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Hearing on Maratha reservation today

राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत आज (ता. 19) सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य सरकारने माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत आज (ता. 19) सुनावणी होणार आहे. यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले माजी ऍटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. रोहतगी यांच्याबरोबरच ज्येष्ठ विधिज्ञ परमजितसिंग पटवालिया, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केलेले विधिज्ञ निशांत कटणेश्वरकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ऍड. सुखदरे, ऍड. अक्षय शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, विधी व न्याय विभागाचे सचिव (विधी विधान) राजेंद्र भागवत, सहसचिव गुरव हे सर्व जण साह्य करणार आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांनी यासंदर्भात संपूर्ण तयारी केली असून, प्रत्यक्ष हजर राहून आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार आहेत. 

loading image