महाराष्ट्र तापतोय; काय काळजी घ्याल ?

उष्णतेची लाट ही इतर धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकीच एक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
heat wave
heat wavegoogle

मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वातावरणाची स्थिती आणखी बिघडत जाणार असल्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहाणे अपेक्षित आहे.

उष्णतेच्या लाटेचे परिणाम त्वरीत जाणवत नसल्याने त्याकडे फार गांभीर्याने लक्ष दिले जात नाही; मात्र तरीही उष्णतेची लाट ही इतर धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकीच एक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या आपत्तीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

heat wave
पुन्हा उष्णतेची लाट!

... हे करा, सुरक्षित राहा

१. दूरचित्रवाणी, आकाशवाणी, इत्यादींच्या माध्यमातून स्थानिक वातावरणाची अद्ययावत माहिती मिळवत राहा.

२. तहान लागत नसेल तरीही पुरेसे पाणी पित राहा.

३. मुख पुनर्जलीकरण द्रावण (ORS), लस्सी, भाताची पेज, लिंबू सरबत, ताक, इत्यादींद्वारे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा.

४. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैल, सुती कपडे घाला.

५. टोपी, छत्री किंवा कापडे डोके झाका.

६. घरातील प्राण्यांना सावलीखाली ठेवा आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्या.

७. उभ्या केलेल्या गाडीमध्ये लहान मुलांना किंवा प्राण्यांना ठेवू नका. गाडी तापल्यास त्यांना त्रास होऊ शकतो.

हवामान विभागाचा इशारा

२९ एप्रिल या दिवशी अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे, २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत नागपूर येथे आणि २ मे या दिवशी पुन्हा वर्धा येथे yellow alert देण्यात आला आहे. याचाच अर्थ, या सर्व ठिकाणी संबंधित दिवशी उष्णतेच्या लाटेची ५१ ते ७५ टक्के शक्यता आहे. ३० एप्रिल ते २ मे या काळात अकोला, चंद्रपूर, यवतमाळ येथे तसेच ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी वर्धा येथे नारिंगी अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी संबंधित दिवशी उष्णतेच्या लाटेची २६ ते ५० टक्के शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com