esakal | पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात धुवाधार
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात धुवाधार

राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. तर, कोकण- गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात धुवाधार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. तर, कोकण- गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या नैऋत्य मॉन्सूनचे संपूर्ण देशातून बाहेर पडण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार येत्या दोन दिवसात नैऋत्य मॉन्सून हा उत्तर महाराष्ट्रातून तर संपूर्ण देशातून २८ ऑक्‍टोबर पर्यंत बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान त्याचवेळी ईशान्य मॉन्सून हा दक्षिण भारतात म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुडुचेरी सारख्या राज्यातील काही भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्‍यता देखिल वर्तविण्यत आली आहे.

शनिवारी शहर व परिसरात पुन्हा पावसाने जोर धरला होता. सध्या शहरात सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे चित्र आहे. शनिवारी सकाळपासूनच शहर व परिसरात हवामान कोरडे व आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळी चार नंतर शहरासह उपनगरातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हाजेरी लावली. यामध्ये पुण्यात २५.७ मिलीमीटर तर लोहगाव येथे १.२ मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली.  बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम म्हणून, राज्याभर काही प्रमाणात बाष्प अद्याप असल्याने हा पाऊस पडत आहे.

Edited By - Prashant Patil