
मुंबई : मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने आज दमदार हजेरी लावली. पहाटेपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचून कामासाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरही दरड कोसळल्याने वाहतुकीला फटका बसला. जोरदार कोसळलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.