राज्यात 5 दिवस मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा; 'या' तिन जिल्ह्यांना यलो अलर्ट : Weather Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.

राज्यात 5 दिवस मेघ गर्जनेसह पाऊस: 'या' तिन जिल्ह्यांना यलो अलर्ट

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

अरबी समुद्रासह (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 12 ते 16 नोव्हेंबर पर्यंत राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात (Konkan, Central Maharashtra and Marathwada) हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यात सर्वत्र थंडी वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाण ढगाळ वातावरण होते. आता शनिवार पासून (ता.१३) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या तिन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे याठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस होण्य़ाची शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे. तसेच सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाला आहे. यामुळे साखर पट्ट्यातील भागात ऊस तोडणीला व्यत्यय येणार आहे.

loading image
go to top