esakal | कोकणाला झोडपले, मराठवाड्यात दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून काढले. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी (ता.६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कुलाबा येथे ३३१.८ मिलिमीटर पाऊस झाला. वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोकणात पावसामुळे शेतीला फटका बसला मात्र मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला.

कोकणाला झोडपले, मराठवाड्यात दिलासा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून काढले. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी (ता.६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कुलाबा येथे ३३१.८ मिलिमीटर पाऊस झाला. वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोकणात पावसामुळे शेतीला फटका बसला मात्र मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला. मात्र, काही ठिकाणी पावसाने घरांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य व्यापले

  • कोकणातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांत तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
  • मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. 
  • सांगली, सोलापूर, नगर, नाशिक खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात हलक्या पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावले आहेत. 
  • मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, हिंगोली,लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. 
  • औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. 
  • विदर्भातील बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. अकोला वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. 

Edited By - Prashant Patil