esakal | नांदेडला 19, तर परभणीत चार महसूल मंडळांत अतिवृष्टी 
sakal

बोलून बातमी शोधा

rain

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली.

नांदेडला 19, तर परभणीत चार महसूल मंडळांत अतिवृष्टी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. या तीन तालुक्‍यांसह 19 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 778 मिलिमीटरनुसार सरासरी 48.63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हिंगोली जिल्ह्यात पिकांना जीवदान 
हिंगोली जिल्हाभरात आज झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. औंढा नागनाथ तालुक्‍यात मात्र पावसाचा जोर जास्त असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यातील राजदरीजवळील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. तर वसमत तालुक्‍यातील हट्टा ते सावंगी रस्त्यावरील घामोडा नाल्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला होता. 

परभणीत चार मंडळांत अतिवृष्टी 
जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतखऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेपर्यंत सुरू होता. दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 40.70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माखणी (ता. गंगाखेड), देऊळगाव (ता. सेलू) पाथरी, सावंगी म्हाळसा (ता. जिंतूर) या चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. रविवारीही (ता. 1) दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते, तर काही भागांत पावसाच्या सरी कोसळ्या. 

loading image
go to top