Weather Update : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पाऊसही लावणार हजेरी; आज 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आज गणपती विसर्जनाच्या दिवशीही अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे
Weather Update
Weather Update Esakal

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. आज गणपती विसर्जनाच्या दिवशीही अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईतही आज मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार सरी कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील आंबोली येथे सर्वाधिक ११७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत असून, मराठवाड्यात कमीअधिक पाऊस आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Weather Update
Weather Update: छत्र्या, रेनकोट तयार ठेवा..., राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात संततधार

मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर गेल्या सहा दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. जळगावमधील एरंडोल तालुक्यात अंजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

हनुमंतखेडे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील शेतकऱ्याचा अंजनी नदीपात्रात वाहून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहे. कोल्हापुरात पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.

Weather Update
Rain Update : ढगफुटीसदृश पावसाने कोल्हापूर, दाजीपूरला झोडपले; पाच तासांत 137 मिलिमीटर पावसाची नोंद, आजही मुसळधार?

कोकणात ढगांचा गडगडाट

मागील पाच ते सहा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोर वाढला असून, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी तालुक्यांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळल्या. पावसाचा जोर असाच राहिला तर लोंब्या आलेले भात पडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे.

Weather Update
Weather Update: आज राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com