esakal | बापरे! रायगड जिल्ह्यात कोसळला मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती!
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rainfall

रायगड जिल्ह्यात कोसळला मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती!

sakal_logo
By
नरेश शेंडे

रायगड : राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी (Rainfall) कोसळत आहेत. मुंबईत पावसाची ओढ असल्याने मुंबईकरांवर (Mumbai rain) पाणीटंचाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे. मात्र, काही ठिकाणी दिसेनासा झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्याला (Raigad) मात्र पुरतं झोडपून काढलं आहे. जिलह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rainfall) कोसळल्याने पूरसदृश्य परिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे . रविवारी ११ जुलैला आणि आज सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Heavy rainfall in raigad district flood situation creates in raigad)

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची सविस्तर माहिती

मुरुडच्या राजपुरी येथे एका झोपडपट्टीवर दरड कोसळली आहे. पण कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. खारीकवाडा, नांदगाव, उसर्ली, बोर्लीनाका, आदाड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूराचे पाणी भरले आहे. त्या ठिकाणी स्थानिक पथकाच्या व बचाव पथकाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. येथील जवळपास 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर काही नागरिकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था जवळील मंदिरामध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा: अनिल देखमुखांच्या याचिकेवर हायकोर्टानं निर्णय ठेवला राखून!

अलिबागच्या काशीद येथे अतिवृष्टीमुळे अलिबाग-मुरूड मार्गावरील पूल वाहून गेला आहे. या दूर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. एकदरा येथील विजय गोपाळ चव्हाण (50) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. या दुर्घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रोहा येथील केळघर येथील रोहा - मुरूड रस्त्यावर दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्यात आली आहे. तर अलिबाग मध्ये चिंचोटी येथे पांडूरंग लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या एका गोठ्याचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. गोठ्यातील प्राणी मात्र सुरक्षित आहेत. महाड येथे एका पक्क्या घराची एक पूर्ण भिंत कोसळली असून घराचे तुरळक नुकसान झाले आहे.

माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वावे येथे आंबेत वावे मार्गे हरिहरेश्वर रोडवरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच श्रीवर्धन बोर्ली रस्त्यावर कार्ले येथे पाणी साचल्याने बॅरिकेट्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. श्रीवर्धन येथील भट्टीचा माळ येथे पावसामुळे एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झालेली नाही. रायगड पाटबंधारे विभागाने आज १२ जुलै रोजी अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सर्व नदयांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असल्याची माहिती आहे. तर जिल्हयातील इतर तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image