राज्यात यंदा धुवाधार पावसाची नोंद;पुण्यात ४१ टक्के जास्त पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

राज्यात मुंबईसह नगर व औरंगाबाद जिल्ह्यांना यंदाच्या पावसाळ्यात धुवाधार पाऊस पडला.मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली.पुण्यात जूनच्या मध्यावधीत मॉन्सून दाखल झाला.जूनमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली

पुणे - पुणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के जास्त पाऊस पडला. या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याला राज्यात आठवा क्रमांक मिळाला. बृहन्‌ मुंबई, मुंबई उपनगरसह औरंगाबाद, नगर, सिंधुदुर्ग, धुळे आणि बीड जिल्ह्यांमध्ये पुण्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. 

पुण्यात जूनच्या मध्यावधीत मॉन्सून दाखल झाला. जूनमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाने जूनची सरासरी सहज ओलांडली. पण, जुलैमध्ये मोठा ‘ब्रेक’ घेतला. पुणे जिल्ह्यात १ जून ते २९ सप्टेंबर या दरम्यान  १२००.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या चार महिन्यांमध्ये पुण्यात सरासरी ८५४ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या तुलनेत यंदा ४१ टक्के जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. १२००.१ पैकी १८४.६ मिलिमीटर पाऊस १ ते २९ सप्टेंबर दरम्यान पडला आहे. या महिन्यात सरासरी १४८.९ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीची तुलना करता २४ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद सप्टेंबरमध्ये झाल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात मुंबईसह नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांना यंदाच्या पावसाळ्यात धुवाधार पाऊस पडला. मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्याच वेळी अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथे पावसाने ओढ दिली.

या वर्षीचा मॉन्सून केरळमध्ये बरोबर १ जूनला दाखल झाला. त्याने राजस्थानपर्यंतचा ३७ दिवसांचा प्रवास यंदा अवघ्या २५ दिवसांमध्येच पूर्ण केला. महाराष्ट्रात ११ जूनला मॉन्सूनने हजेरी लावली. १ जून ते २९ सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यातील मॉन्सून
राज्यात यंदा मुंबई, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सर्वाधिक सरी पडल्या. तेथील सरासरीच्या ६० टक्‍क्‍यांहून अधिक पावसाची नोंद या जिल्ह्यांमध्ये झाली. अकोला, अमरावती आणि यवतमाळ तेथील सरासरीच्या तुलनेत ६० टक्‍क्‍यांहून कमी पाऊस पडला.

मराठवाड्यात धो-धो
दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जिल्ह्यांवर यंदा मॉन्सून मराठवाड्यात धो-धो पडला. तेथील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑगस्टने महाराष्ट्राला तारले
सुरुवातीच्या दमदार हजेरीनंतर पावसाने जुलैमध्ये दडी मारली. मात्र, ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला पाण्याच्या संकटातून बाहेर काढले. १ जून ते ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या तुलनेत पाच टक्के पावसाची नोंद झाली होती. राज्यात १ जून ते ३० ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त पाऊस पडला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सरासरीपेक्षा ६० टक्के जास्त पाऊस पडलेले जिल्हे
मुंबई : ६७
नगर : ८०
औरंगाबाद : ६५

पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे (२० ते ५९ टक्के)
मुंबई उपनगर : ५९
रत्नागिरी : २४
सिंधुदुर्ग : ५३
कोल्हापूर : २४
सांगली : २८
सोलापूर : २७
पुणे : ४१
बीड : ४६
जालना : ३९
जळगाव :  २४
परभणी :२०
धुळे : ४८
लातूर : ३०
उस्मानाबाद : २४ 

पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्हे (उणे १९ ते १९ टक्के)
सातारा : ७
रायगड : १६
ठाणे : १९
नाशिक : १९
नंदूरबार : १०
बुलडाणा : ५
वाशीम : १६
हिंगोली : ८
नागपूर : ७
नांदेड : ९
भंडारा : सरासरीपेक्षा ४ टक्के कमी पाऊस 
वर्धा : सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस
गोंदिया : सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस
गडचिरोली : सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस
चंद्रपूर : सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस

सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे (उणे ५९ ते उणे २०)
अकोला : सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस
अमरावती : सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस
यवतमाळ : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस

राज्यात असा पडला पाऊस

महिना सरासरी  प्रत्यक्ष पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत टक्के
जून २०७.६ २५१.४ २१
जून आणि जुलै ५३८.५ ५६३.९ ५ 
जून ते ऑगस्ट ८२४.५ ९६१.६ १७
जून ते २९ सप्टेंबर ९९९.८ ११६३.८ १६

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains lashed the state this year 41percent more rain in Pune