सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर; भात लागवडीच्या कामांना वेग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

आज कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (ता. ४) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे - मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी मारलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे भातलागवडीच्या कामांना वेग येणार आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील हतनूर आणि बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे सर्वाधिक १९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा आरंभ झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोरी व हतनूर प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील आवक  वाढली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
आज कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (ता. ४) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains at Sindhudurg, Ratnagiri paddy cultivation