हेल्मेट सक्ती! पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदेश; नियम मोडल्यास सेवापुस्तकात होणार नोंद, रस्ते अपघातात एका वर्षात १५००० मृत्यू, वाचा...

वाहतूक कायदा ‘कलम-१९४ डी’नुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट न घातलेल्या अधिकारी, अंमलदारांचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यास त्या अधिकारी किंवा अंमलदाराकडून दंड वसूल केला जाणार आहे.
हेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्ती

sakal solapur

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गतवर्षी राज्यात रस्ते अपघातात १५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यात सुमारे साडेसहा हजार दुचाकीस्वार आहेत. बहुतेक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत, त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर आता दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाही हेल्मेट वापरावेच लागणार आहे. अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी तसे काढले आहेत.

राज्यात दहा वर्षांतील रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात देखील २०२५-२६ या वर्षात सुमारे ११०० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मृत बहुतेक दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. हेल्मेट वापरल्याने प्राणातिंक अपघाताची व गंभीर दुखापताची शक्यता कमी असते. या अनुषंगाने पोलिसांनी हेल्मेट अंमलबजावणी कशी करावी, यासंदर्भात वेळोवेळी कायदेविषयक प्रशिक्षण जिल्हा व आयुक्तालय स्तरावर देण्यात येते. तरीदेखील, राज्यातील अन्य सर्व शहरे आणि जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत अंमलबजावणी समाधानकारक नाही.

मुंबई, नागपूर वगळता बाकीच्या शहर-जिल्ह्यात अवघे २० टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रेणेने कठोर कारवाई करावी. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी आधी हेल्मेट वापरावे, अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. ३ एप्रिल रोजी नागपूरला राज्यातील सर्वच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर शुक्रवारी (ता. ९) अपर पोलिस महासंचालकांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

अपर पोलिस महासंचालकांचा इशारा...

वाहतूक कायदा ‘कलम-१९४ डी’नुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट न घातलेल्या अधिकारी, अंमलदारांचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यास त्या अधिकारी किंवा अंमलदाराकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्यांनी जाणूनबुजून कायद्याचा भंग केल्याचे समजून त्याची नोंद सेवापुस्तकात देखील केली जाईल, असा इशारा अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com