पुढचे 4 तास मुंबईसाठी हायअलर्ट; पावसामुळं रेल्वे सेवेलाही मोठा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain in Mumbai

दोन दिवसांच्या मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं.

पुढचे 4 तास मुंबईसाठी हायअलर्ट; पावसामुळं रेल्वे सेवेलाही मोठा फटका

मुंबई : दोन दिवसांच्या मुसळधार पावसानं मुंबईची (Heavy Rain in Mumbai) तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये धुवांधार पाऊस झालाय. यामुळं रेल्वे, रस्ते आणि शाळांना याचा मोठा फटका बसलाय. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून मुंबईला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलाय.

मुंबईसाठी पुढचे चार तास महत्त्वाचे

हवामान खात्यानं (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि नजीकच्या शहरांमध्ये पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. खरंतर, कालपासून सुरू असलेला पाऊस अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळं आता मुंबईकरांसाठी पुढचे काही तास धोक्याचे आहेत.

हेही वाचा: Kandivali Double Murder : मुक्ती मिळणार नाही म्हणून लग्न, तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई-उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळं रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलाय. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पावसामुळं संथ गतीनं धावत आहे. त्यामुळं रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. तर, हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरुय. त्यामुळं तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून, याचा फटका प्रवाशांना बसत आहे.