महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड पूल महाराष्ट्रात बनणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cable stayed bridge

देशातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रिज महाराष्ट्रात बांधला जात आहे.

महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड पूल महाराष्ट्रात बनणार

मुंबई - देशातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रिज महाराष्ट्रात बांधला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत हा १३२ मीटर उंच पूलाचे बाधकाम सुरु आहे. सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतची लांबी सुमारे 19 किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल आणि दृतगती मार्गाचे अंतर सहा किलोमीटरहून कमी करणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २५ मिनिटांपेक्षा कमी होईल.या पूलाचे बांधकाम पायाभूत क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी अफकॉन्स करत आहे.

महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे.त्यापैकी अफकॉन्स पॅकेज-दोन चे काम करत आहे. यात विद्यमान द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण, दोन उड्डाणपूल, त्यातील एक केबल-स्टेड ब्रिज, यासह इतर कामांचा समावेश आहे. सध्या 850 मीटर लांबीच्या पूलाचे फाउंडेशनचे पूर्ण झाले आहे.तर केबल-स्टेड पूलची लांबी 650 मीटर एवढी आहे. हा पूल जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असेल जो देशातील कोणत्याही महामार्ग प्रकल्पामधील सर्वात उंच असेल. या नव्या लिंकमुळे अपघात कमी होण्यास आणि दळवळण जलद होण्यास मदत होईल अशी माहिती अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक रणजित झा यांनी दिली.

रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग आव्हानात्मक

प्रकल्पाला विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वे चे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते.ब्लास्टिंग दरम्यान, केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. तसेच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर हे देखील आव्हात्मक आहे.

मिसिंग लिंक-पॅकेज-II चे वैशिष्ट्ये -

-5.86 किमी सध्याच्या द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण

-10.2 किमी अप्रोच रस्त्यांचे बांधकाम

-132 मीटर उंच केबल-स्टेड ब्रिजचे बांधकाम

- देशातील रस्ते महामार्गावरचा देशातील सर्वात उंच केबल पूल

-यात 82 मीटरचा उंचीचा सर्वात उंच पिल्लर

-केबल पूलाची लांबी 650 मीटर

टॅग्स :maharashtraBridge