Vidhan Sabha 2019 : सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये तर सर्वात कमी 'या' मतदारसंघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबई : सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे.

अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highest candidates contest are in Nanded South and lowest in Chiplun constituency