Maharashtra Politics : उद्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Hearing

उद्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका शिंदे गटातील आमदारांवर कडाडून टीका केली आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र येत आहेत. आज तुम्हीही घेऊन आला आहात. मी याला आपल्या विजयाचा पहिला टप्पा मानतो. यानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, की उद्या न्यायालयात जे व्हायचं ते होऊ दे, मला न्याय देवतेवर विश्वास आहे. तसेच जनतेच्या भावना आपल्या बरोबर आहेत. जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिंमत नाही. गद्दारांना जनताच धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा: Viral Video : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण, महिलेला अटक

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोर्टात उद्या व्हायचं ते होईल, मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकांच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणूकीची वाट पाहात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे. तुम्हीदेखील पाच खोके आणले आहे. मात्र, पाच खोके नॉट ओके. त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

दरम्यान उद्या शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सुनावणी होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात कोण विजयी होईल याकडे सगळअयाचं लक्ष लागले आहे.

हेही वाचा: चिमुरड्यांना कवटाळलेल्या अवस्थेत माय-लेकरांचे मृतदेह, भूस्खलनाने कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

Web Title: Hivsena Uddhav Thackeray On Shinde Group Mla Before Supreme Court Hearing On 22 Aug

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..