
पाली : रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने सोमवारी (ता.15) अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली.