Vidhan Sabha 2019 : पंकजाताईंचे गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल : अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

भगवानबाबांच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य घालविले. पंकजाताईही गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

सावरगाव : भगवानबाबांच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य घालविले. पंकजाताईही गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (मंगळवारी) दसरा मेळाव्या निमित्त सावरगाव येथील भगवान भक्‍ती गडावर उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शहा यांना निमंत्रण दिले होते. भगवान भक्‍ती गड, सावरगाव, ता. पाटोदा, जिल्हा बीड येथे असून, मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी दसऱ्यादिवशीच मी भगवानगडावर आलो होतो. आता पुन्हा भगवानबाबाच्या दर्शनाला आलो आहे. भगवानबाबांनी वंचितांसाठी संघर्ष केला. शिक्षणाचा विचार लोकांमध्ये रुचविला. ओबीसी, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. मराठवाड्याला खूप प्रेरणा मिळाली आहे. भगवानबाबांचे स्मारक प्रत्येकाला प्रेरणा देत राहील. पंकजाताईंनी हे भव्य स्मारक उभारले आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटविल्याबद्दल अमित शहा म्हणाले, की आम्हाला 300 जागा मिळवून दिल्यानंतर आम्ही कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला. काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम मोदींनी केले आहे. 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टी मोदी सरकारने केल्या. सर्व भगवानभक्तांनी मोदींनी हटविलेल्या कलम 370 निर्णयाची माहिती द्यावी. ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home ministar Amit Shah appreciate Pankja Munde in sawargao on dussehran occasion