गृहमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांचे केले कौतुक, म्हणाले आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

गृहमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांचे केले कौतुक, म्हणाले आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या (gadchiroli police) शौर्यामुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रातून नक्षल चळवळीचे (naxal in maharashtra) पाय उखडताना दिसत आहेत. पण, राज्याची व या जिल्ह्याची सीमा लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात नक्षलवादी पुन्हा फणा वर काढताना दिसतात. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यास सांगून या पत्राद्वारे महाराष्ट्रात नक्षल चळवळीचा कसा बंदोबस्त करण्यात येत आहे, याची माहिती देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी यावेळी सांगितले. (home minister dilip walse patil praised gadchiroli police for killing of 13 naxal)

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

गडचिरोली पोलिसांचे कौतुक -

नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना पोलिसच आपले खरे मित्र असल्याचे समजून येत आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी यावेळी पोलिसांच्या सी-६० पथकाचे शुक्रवारी १३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याच्या कारवाईबद्दल अभिनंदन केले.

पोलिस विभागाचे कौतुक व अभिनंदन करताना गृहमंत्री म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी दाखविलेले शौर्य अतिशय कौतुकास्पद आहे. नक्षलवाद्यांशी शस्त्राने झुंजतानाच पोलिस विभाग इतर प्रशासकीय विभाग पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन गोरगरीब आदिवासींना मदतीचा हात देते. त्यामुळे आता आपल्या या दौऱ्यात आपण पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणल्या असून पोलिस विभाग अधिक सक्षम करण्यासह विकासकामांना गती देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान) संजय सक्‍सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top