गृहमंत्र्यांनी शब्द पाळला ! कोरोनाबाधित मृत पोलिसांच्या कुटुंबांना दिली 'एवढी' मदत

तात्या लांडगे
Sunday, 21 June 2020

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केले जातील धनादेश 
कोरोना योध्दा म्हणून रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा देत नागरिकांची सुरक्षितता करणाऱ्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना या विषाणूमुळे मृत्यू झाला. तत्पूर्वी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक कोटींची मदत प्राप्त झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश उद्या (सोमवारी) सुपूर्द केला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्तात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केली. त्यानुसार आता सोलापूरसह राज्यातील मृत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांसाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मदतीची रक्‍कम वितरीत करण्यात आली आहे. 

नाकाबंदीवेळी शहीद झालेल्या कर्मचाऱ्याला दहा लाख 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या जिल्हाबंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैदराबादहून जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनाला अडविताना मंद्रूपजवळ झालेल्या अपघातात ग्रामीण पोलिस दलातील एका पोलिस कर्मचारी शहीद झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी, असा प्रस्ताव सोलापूर पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी पोलिस महासंचालनालयास पाठविला होता. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत मिळाली आहे. उर्वरित मदतीसाठी पाठपुरावा सुरु असल्याचे अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.  

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केले जातील धनादेश 
कोरोना योध्दा म्हणून रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा देत नागरिकांची सुरक्षितता करणाऱ्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना या विषाणूमुळे मृत्यू झाला. तत्पूर्वी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक कोटींची मदत प्राप्त झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश उद्या (सोमवारी) सुपूर्द केला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Home Minister kept his word and gave help to the families of the dead policemen