पुणे - राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने होमिओपॅथी च्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषध देण्याची परवानगी दिली आहे. त्याचा फायदा राज्यातील ९० हजार होमिओपॅथी च्या डॉक्टरांना होणार आहे. परंतु, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सूरू करण्यापूर्वी त्यांनी राज्य शासनाचा मान्यता प्राप्त ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे त्यामध्ये नमुद केले आहे.