"बिल मागणारा हॉटेलचालक राष्ट्रवादीचाच"; सदाभाऊंनी सादर केले पुरावे

सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचं बिल चुकत न केल्यानं सांगोला येथील हॉटेल चालकानं त्यांचा ताफा अडवत पैशाची मागणी केली होती.
hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil
hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil

मुंबई : आपल्याकडे हॉटेलचं बिल मागणारा हॉटेल चालक हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचा दावा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काही पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. तसेच आपली बदनामी करण्यामागे आणि आपल्याविरोधात हल्ला आणि कटकारस्थान रचण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच हात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (hotel driver who demanded the bill is a NCP activist Evidence presented by Sadabhau Khot)

hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil
शिवसेना वर्धापन दिन : CM ठाकरेंनी 'या' पाच प्रमुख मुद्द्यांवर केलं भाषण

पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत म्हणाले, हॉटेलचं बिल न दिल्याचा आरोप करणाऱ्या हॉटेल चालकाचा आपण भांडाफोड करत आहोत. ज्यावेळी अशोक शिनगारे नावाचा हॉटेल चालक यानं सुरुवातीला सांगितलं होतं की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. राष्ट्रवादीचा आणि माझा काहीही संबंध नाही. आज मी याचा स्पष्ट पुरावा सादर करत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रवेश सोहळ्यावेळी हा व्यक्ती माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबत असल्याचा फोटो आहे. दुसरा पुरावा म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं स्वागत करताना शिनगारे यानं टेम्प्लेट वाटले यामध्ये त्यानं स्वतःचा उल्लेख स्पष्टपणे राष्ट्रवादी नेते असा केला आहे.

निवडणूक संपल्यानंतरही जेवणावळी कसा करत होता?

सदाभाऊ पुढे म्हणाले, शिनगारे यांनी सांगितलं होतं की, निवडणूक काळात सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या सांगण्यावरुन सदाभाऊंसाठी मी जेवणावळ घातली. ही जेवणावळ १५ एप्रिल २०१४ ते १० मे २०१४ या काळात घातल्याचं त्यानं सांगितलं. पण माढा लोकसभा मतदारसंघात १५ एप्रिलला लोकसभेचा प्रचार संपला, त्यानंतर १७ एप्रिलला मतदान झालं. तरीही हा बहाद्दर निवडणूक झाल्यानंतर पंचवीस दिवस प्रचाराचा काळ नसताना माझा प्रचार सुरु नसताना पंचवीस दिवस आपल्या हॉटेलमध्ये कसा काय जेवण घालत होता?

नऊ वर्षे हा हॉटेल चालक कुठे होता?

ज्या कागदावर त्यानं टिपण तयार केलं त्या कागदाला नऊ वर्षे होत आली तरी घडी पडलेली नव्हती. मला प्रश्न हा पडलाय की नऊ वर्षे हा माणूस काही बोलला नाही. नऊ वर्षांनतर ज्या तारखा यानं सांगितल्या त्या मतदानानंतरच्या तारखा सांगितल्या. या तारखांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला मार्गदर्शन करताना तारखा तरी बघायच्या होत्या.

नाचक्की होईल म्हणून राष्ट्रवादीनं कट रचला

तिसऱ्या मुद्द्यात शिनगारे म्हणतो, निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसांनी सदाभाऊंना फोन केला. माझं बिल द्या त्यावेळी सदाभाऊ म्हणाले, मी आमदार आहे मंत्री आहे. माझ्या पीएला तुम्ही फोन करा. पण ही तारीखही त्यांची चुकली. कारण मी सव्वा दोन वर्षांनंतर म्हणजेच सन २०१६ला मी आमदार आणि मंत्री झालो. म्हणजे इथंही तो स्पष्टपणे खोटं बोललेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंच हे कुभांड रचलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट माझ्या अंगावर आले. राष्ट्रवादीचा हल्ला झाला म्हणून राज्यात नाचक्की होईल म्हणून त्यांनी कट रचला. त्यानुसार या हॉटेलवाल्यानी तिथं जायचं आणि फक्त हॉटेलचं बिल राहिलं म्हणून मला अडवायचं. माझ्यासोबत बोलत राहून माझ्या कार्यकर्त्यांनी जर धक्काबुक्की केली तर माझ्यावरती खुनी हल्ला करायचा असा यांचा कट होता पण तो यशस्वी होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com