राज्यात हाॅटेल, रिसाॅर्टस् शंभर टक्के क्षमतेने सुरू; मार्गदर्शक सूचना आणि कार्यप्रणाली जारी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 11 September 2020

मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् आदी निवासी सुविधांना शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे.

मुंबई : मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् आदी निवासी सुविधांना शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे. मात्र, हे करताना कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या कार्यप्रणालीमध्ये (एसओपी) या सूचनांचा अंतर्भाव  करण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उत्पन्न बंद झाल्याने वसई 'एपीएमसी'च्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड;  बाजार समितीचा मात्र स्वेच्छानिवृत्तीचा सल्ला

हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश द्यावा. सेवा देताना तसेच, वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधित प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधित प्रवाशाची नाहरकत घ्यावी. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवावा. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घ्यावी आणि डिजीटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. याच पद्धतीने होम-स्टे, बी अँड बी, फार्म-स्टे आदींसाठीही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही कार्यप्रणाली तयार केली असून  पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तसेच, पर्यटन संचालनालयामार्फत प्रादेशिक कार्यालयांद्वारे विविध हॉटेल असोसिएशन्स, व्यावसायिक यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करुन कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मुंबईच्या चिंतेत आणखी भर! कोव्हिड रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची कमतरता; नर्सिंग होम बंद झाल्याने फटका

पर्यटकांची सर्व माहिती आवश्यक
हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करावी. पर्यटकांचा प्रवास आणि आरोग्य इतिहासाबाबतची सर्व माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-ईन करण्यापुर्वी शक्यतो ऑनलाईन भरुन घ्यावा. शक्य असल्यास क्यू आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-ईनसारख्या बाबी सुरु कराव्यात, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.  

मुलांचे मोकळे खेळणे बंद
हाॅटेल किंवा रिसाॅर्टमध्ये अभ्यागतांनी काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती त्यांना बूकलेट किंवा व्हीडीओच्या स्वरुपात देण्यात यावे. अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास आवर्जून वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा. रुम सर्व्हीस संपर्करहीत असावी. अभ्यागताने मागवलेली ऑर्डर रुमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील, अशा बाबींचा सुचनांमध्ये समावेश करण्यात आला आहे
------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels, resorts in the state reopen in full capacity