दहावी नंतर करिअर फक्त 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' यासाठी जॉईन करा सकाळ पेपर्स आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

How to choose a career after 10th
How to choose a career after 10th

पुणे :  १० वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, डिफेन्स या क्षेत्रात करिअर करण्याचे टार्गेट ठेवून अनेक विद्यार्थी वाटचाल करत असतात. शालेयस्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमधून आपल्या क्षमता अधिकाधिक विकसित करण्याकडे विद्यार्थी व पालकांचा कल दिसून येतो. हे प्रयत्न शास्त्रीयदृष्ट्या अधिक समृद्ध करण्यासाठी वाईतील दिशा ॲकॅडमी पालक व विद्यार्थांसाठी कौन्सिलिंग, मार्गदर्शन मेळावे, तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करून शहरांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी झाली आहे.

१० वी झाली की आयुष्याला कलटणी देणारी करिअरची अवघड वळण वाट सुरू होते. या वाटेवर मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ व दिशा ॲकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दहावीनंतर काय?’ याविषयावर विनामुल्य वेबिनार रविवार दिनांक २१ जून रोजी, सकाळी ११ वाजता Zoom App वर (झूम ॲपवर) घेण्यात येणार आहे. यात वाईच्या दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष – प्रा. डॉ. नितीन कदम सर मार्गदर्शन करतील. करिअर मार्गदर्शन वेबिनार तीन भागात होणार आहे. कोविड-१९ चे संकट, लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण, परीक्षा या सगळ्याबाबत संम्रभावस्था असताना पुढील ठळक मुद्द्यांवर प्रा. डॉ. नितीन कदम मार्गदर्शन करतील .

    दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी ? 
    Aptitude Test महत्व काय ?
    इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, कॉलेजेस व ब्रांचेस बद्दल माहिती.
     या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी महत्वाच्या बाबी कोणत्या?
    कोरोना व लॉकडाऊनचा या परीक्षांच्या तयारीवर काय परिणाम होऊ शकतो.
    ऑनलाईन तयारी कशी करावी?
    दिशा अकॅडमी, वाई येथे या परीक्षांची तयारी कशा प्रकारे केले जाते.

रविवार दिनांक २१ जून रोजी, सकाळी ११ वाजता Zoom App वर (झूम ॲपवर) घेण्यात येणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी – 7775925923 / 7775024445 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

विविध स्पर्धा परीक्षांची सर्व्वोत्तम तयारी करून वाईतील दिशा ॲकॅडमी सर्व अत्याधुनिक सोईसुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक, मेस, हॉस्टेल, अभ्यासावर लक्ष केंद्रात करता येईल असे वातावरण यासाठी सुपरिचित आहे. तसेच सध्याची परिस्थिती पहाता ऑनलाईन शिक्षणाचे काटोकोर नियोजन करून सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य व सुरक्षेच्या सर्व मानदंडाचे पालन यावर भर दिशा ॲकॅडमीने दिलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com