सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार?; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnvis_Uddhav Thackarey
Devendra Fadnvis_Uddhav Thackarey

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. पुण्यात एल्गार परिषदेत (Elgar Parishad) वादग्रस्त विधान करणाऱ्या शर्जिल उस्मानी (Sharjeel Usmani) याच्यावरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे.

भाजपच्या प्रचारात 'गांगुली'; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला मोठा विश्वास

शर्जिल उस्मानीवर भाष्य करताना फडणवीसांनी सलग तीन ट्विट केले आहेत. यात फडणवीस म्हणाले, "आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच. पण प्रत्यक्षात काय? तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केलं?" 

पुणे : 'जगदंबा तलवार परत आणा'; कोल्हापूरचे तरुण घुसले गहुंजे मैदानात 

शर्जिलविरोधात दाखल केलेल्या मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. तर १५३ अ कलम यामध्ये लावलं आहे, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल अशा विधानांसाठी लावलं जातं. खरंतरं एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

पुणे : क्वारंटाइन सेंटरमधून तरुणीचा पळून जाण्याचा प्रयत्न; पण घडलं भलतंचं! 

न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्राविरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवं होतं. पण, प्रत्यक्षात मुख्यमंत्री त्यांना जामीन मिळण्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार? असा सवालही यावेळी फडणवीस यांनी केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com