राज्यातील धरणांत किती पाणीसाठा आहे? वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

राज्यातील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा 
५ मार्चअखेर (टीएमसी आणि कंसात टक्‍केवारी)

 • कोयना -     ६९.८५ (६९.७५ टक्‍के)
 • उजनी  -     ३६.१७ (६७.५१)
 • पवना -      ५.४७  (५६.५४)
 • भाटघर -      १६.७४ (७१.२४)
 • भामा आसखेड -     ६.३९  (८३.४०)
 • ऊर्ध्व वर्धा -     १२. ७२ (६३.८६)
 • इसापूर  -     २०.७५ (६०.९६)
 • येलदरी -     २४.९९  (८७.३८)
 • भातसा -     २१.३७  (६४.२३)
 • गोसी खुर्द -     ६.१९   (२३.६९)
 • तोतलाडोह -     ३६.६७  (८७.३६)
 • भंडारदरा -     ९.८७  (९१.९६)
 • मुळा  -     १६.३१  (७५.८५)
 • गिरणा  -     ११.८५  (६४.०१)
 • राधानगरी -     ५.०१  (६५.१३)
 • दूधगंगा -     १५.५५   (६४.८५)

पुणे - राज्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजअखेर दुप्पट उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी जलाशयांमध्ये ३१.७८ टक्‍के पाणीसाठा होता. तो यंदा जवळपास दुप्पट म्हणजे ६०.१४ टक्‍के इतका आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गतवर्षी पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील बहुतांश प्रमुख धरणे काठोकाठ भरली होती. राज्यात पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर आणि नाशिक या विभागातील मोठ्या १४१ धरणांमध्ये गतवर्षी ३३ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध होता. तो सध्या सुमारे ६७ टक्‍के इतका आहे. मध्यम २५८ धरणांमध्ये गतवर्षी ३५.२५ टक्‍के पाणीसाठा होता. 

सध्या ५२.२८ टक्‍के पाणीसाठा आहे. तर दोन हजार ८६८ लघुसिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षी २३.४८ इतका साठा होता. तो यंदा ३५.५३ टक्‍के आहे. या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ८६८ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा आहे.

‘खडकवासला’त १७.४८ टीएमसी साठा  
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये १७.४८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा टीएमसी 
पाणीसाठा अधिक आहे. खडकवासला धरणात पाऊण टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत आणि वरसगाव या दोन धरणांमध्ये १६.६७ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

खडकवासला प्रकल्पातील आजअखेर पाणीसाठा 
(टीएमसी आणि कंसात टक्‍केवारी)

यंदाचा एकूण साठा -     १७.४८  (५९.९७)
गतवर्षीचा साठा -     ११.३८  (३९.०३) 
पानशेत  -      ८.०६  (७५.७२)
वरसगाव  -     ८.६१ (६७.१५)
खडकवासला -      ०.७५  (३८.७८)
टेमघर  -     ०.०६  (२.१२)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much water storage is there in the dams in the state