
सोलापूर ः सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढू लागली आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्येही रोज नवनवीन माहितीची भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडीकल असोसिएशनच्या डॅा. हरीश रायचूर, डॅा. सचिन मुळे, डॅा. वैशाली शिरशेट्टी व डॅा. गुड्डु बबलादी पदाधिकाऱ्यांनी कोरोनाची तीव्रता कशी ओळखावी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक दिले आहे. जाणून घेऊ या कोरोनाची तीव्रता कशी ओळखावी....
आपण सर्वजण सध्या कोरोना या जागतिक महामारीचा सामना करीत आहोत. आपणा सर्वांना माहितच आहे की कोरोना व्हायरसमुळे कोविड 19 हा एक संसर्गजन्य आजार आहे. सध्या तरी या आजारासाठी खात्रीशीरपणे उपयोगी ठरू शकेल असे औषध वा लस उपलब्ध नाही. या आजाराची काही लक्षणे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. ही लक्षणे असल्यास आपल्या रुग्णांच्या जिवीतास धोका आहे हे समजून घेणे गरजेचे ठरू शकते. हा आजार महिला व पुरुषांमध्ये सम प्रमाणात दिसून येतो. हा आजार होण्याचा आपल्या सर्वसामान्य शारीरीक तंदुरुस्तीचा फारसा संबंध नाही. अर्थात हा आजार नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीलाही होऊ शकतो. आपल्या रुग्णाची तब्येत गंभीर आहे हे ओळखण्यासाठी खालील काही मुद्दे सर्वांनी लक्षात घ्यावे.
1. वय 50 वर्षांपेक्षा जास्त असणे
2. रुग्ण लठ्ठ असणे अर्थात बीएमआय 30 पेक्षा जास्त असणे
3. ब्लड प्रेशर, डायबेटीस, श्वसनाचे आजार, हृदयरोग किडनीचे आजार व कॅन्सरसारखे आजार असणाऱ्या रुग्णांची तब्येत कोरोनामुळे जास्त खराब होऊ शकते.
4. फुफुस्साचा आजार असणाऱ्या रुग्णांची तब्येत लवकरच खराब होते.
आपला रुग्ण अॅ़डमीट असताना खालील लक्षणे असल्यास जीवितास सर्वात जास्त धोका आहे हे समजावे.
1. अॅाक्सिजनचे प्रमाण सतत कमी होणे. 90 टक्क्याच्या खाली पातळी जाणे हे निश्चितच वाईट लक्षण म्हणता येईल.
2. दोन्ही बाजूच्या फुफुस्सामध्ये संसर्ग होणे
3. फुफुस्साच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक भागात संसर्ग होऊन न्यूमोनिया होणे.
4. रुग्णाला व्हॅंटिलेटरची गरज पडणे
5. किडनीचे कार्य बंद होणे अथवा काही प्रमाणात त्यावर परिणाम होणे, लघवी कमी प्रमाणात तयार होणे हे अतिशय वाईट लक्षण आहे.
6. ब्लड प्रेशर कमी होणे व ते राखण्यासाठी विशेष औषधांचाी गरज भासणे, 7.रक्ताच्या तपासण्यांमध्यें सीआरपी, डी-डीमर या तपासण्यांमध्ये यांचे प्रमाण काही पटीने वाढणे हे प्रमाण जेवढ्या पटीने वाढले असेल तेवढी आजाराची तीव्रता व त्यामुळे असणारा जीवीतास धोका तेवढ्या पटीने वाढला आहे, असे म्हणता येईल.
8. उपचारादरम्यान सातवा ते 14 वा दिवस हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त अडचणी याच कालावधीतच दिसून येतात.
9. विडी अथवा सिगारेट करणाऱ्या व्यक्तींच्या फुफुस्साचे नुकसान अगोदरच झालेले असते. कोरोनामुळे अशा व्यक्तींच्या जिवीतास जास्त धोका असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.