कसा असेल महामोर्चा? तयारी, गर्दी अन् राजकीय नेते; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

महाविकास आघाडीचा उद्या मुंबईत महामोर्चा

Mahamorcha
Mahamorchaesakal
Updated on

महाविकास आघाडीचा उद्या मुंबईत महामोर्चा पार पडणार आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. महापुरूषांच्या अवमानाविरोधात, राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा विविध प्रश्नांवर हा मोर्चा असणार आहे. तर या मोर्चात दीड ते दोन लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांकडून दिला जात आहे.


Mahamorcha
MVA Morcha : उद्याच्या मोर्चात छोटा राजनचा भाऊ होणार सहभागी; कारणही सांगितलं...

तसेच प्रमुख पक्षांवर प्रत्येकी ५० हजार कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी असणार आहे. तर पोलिस प्रशासनाकडून या मोर्चाला सुमारे २५०० पेक्षा जास्त पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. तर २५० पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकारी असणार आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाकडून या मोर्चाला काही अटी घालण्यात आल्या आहेत.

दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल असं कोणतंही भाष्य नेत्यांनी करू नये, कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, मोर्चात आर्म्स अॅक्टनुसार चाकू, तलवारी अशे कोणतेही शस्त्र बाळगू नये, मोर्चादरम्यान कुठेही फटाके फोडू नये, दिलेल्या मार्गानुसारच हा मोर्चा मार्गास्त करावा, सर्व नियमांच पालन करण्यात यावं, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असा प्रकारच्या अटी या पक्षांसमोर ठेवण्यात आल्या आहेत.


Mahamorcha
'देव तारी त्याला कोण मारी'! पाणगेंड्याने 2 वर्षाच्या चिमुरड्याला गिळलं, तरीही...

हा मोर्चा उद्या म्हणजे १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ११ वाजल्यापासून हा मोर्चा चालू होणार आहे. जे.जे. हॉस्पिटल लगत असलेल्या रिचर्डसन आणि क्रड्स कंपनीपासून मोर्चाला सुरू होणार तर पुढे टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा महामोर्चा जाईल त्यानंतर मुख्य रस्त्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे.

मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी सीएसटी स्थानकाच्या मागे पार्किंगची व्यावस्था करण्यात आली आहे. तर या मोर्चाला मविआ मधील जेष्ठ नेते संबोधीत करणार आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष या मोर्चाला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मात्र राष्ट्रवादी कडून अजित पवार, जयंत पाटील,छगन भुजबळ,सुनील तटकरे, आणी इतर जेष्ठ नेत्यांसह पक्षातील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, या प्रमाणेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, किशोरी पेडनेकर, सुभाष देसाई, अनिल परब, असे अनेक नेते हजेरी लावणार आहे,

तर काँग्रेसमधून सर्व आमदार, त्याच बरोबर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे अनेक जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या महामोर्चामुळे शिंदे-भाजप सरकारवर दबाव निर्माण होवू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com